दापोली डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ४८ वा वर्धापन दिन अतिशय साधेपणाने साजरा
दापोली डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचा ४८ वा वर्धापन दिन अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. विस्तार शिक्षण संचालक डॉ.संजय भावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रमोद सावंत उपस्थित होते.
कुडावळे गावात यावर्षाच्या खरीप हंगामामध्ये विद्यापीठाच्या भातांच्या वाणांचे प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्याचे कुलगुरू डॉ.संजय सावंत यांनी घोषित केले होते. त्याच पार्श्वभूमीवर कुडावळे गावामध्ये रत्नागिरी ५ रत्नागिरी ६रत्नागिरी २४ रत्नागिरी ७ व रत्नागिरी ८ या बियाण्यांचे सामाजिक अंतर ठेऊन वाटप करण्यात आले. त्यासाठी कुलगुरू डॉ.संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली संचालक विस्तार शिक्षण संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.संतोष वरवडेकर आणि डॉ.अरूण माने यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणे पोहचविण्यात आले. या शतप्रतिशत भात लागवड या कुलगुरूंनी सुचविलेल्या आश्वासक प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे भान राखून विद्यापीठ वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
www.konkantoday.com