गुणवत्ता शोध परीक्षेत परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरचे 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत
रत्नागिरी-सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयातील 17 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
इयत्ता पहिलीतील अर्णव मकरंद पटवर्धन (134) याने केंद्राच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरी गुणवत्ता यादी- मुक्ता मोहन बापट (140), गौराई अभिजीत महाकाळ (134), राजमुद्रा मंगेश मोंडकर (132), श्रीधर मंगेशकुमार पाटील (124), पर्णवी परेश ठावरे (120). इयत्ता तिसरी गुणवत्ता यादी- आर्य धनंजय दांडेकर (270), सर्वेश विद्याधर गोठणकर (262), तीर्था निलेश सागवेकर (248), प्राप्ती बाबा अनुसे (244), श्लोक सचिन मोरे (240), हर्ष सागर ढवळे (238). इयत्ता चौथी गुणवत्ता यादी- पर्णिका प्रणव परांजपे (294), आदित्य दत्तात्रय बनगर (276), अद्वैत किशोर आगरे (270), सोहम संतोष मोरे (254), क्षितिज विनायक जाधव (250).
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना सौ. गीताली शिवलकर, सौ. कांचन शिंदे, श्री. उदय आरेकर, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना सौ. प्रणोती सिनकर, श्री. महेश साळुंके, सौ. नेहा भातडे यांनी जादा वर्ग घेऊन मार्गदर्शन केले. इयत्ता पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी, वर्ग शिक्षकांनी वर्गात केलेल्या अध्यापनाच्या आधारे व पालकांच्या मार्गदर्शनाने यश प्राप्त केले आहे.
मुख्याध्यापक श्री. विनोद नारकर यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. श्री. प्रदीप परुळेकर, कार्याध्यक्ष अॅड. सौ. सुमिता भावे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती सुमित्रा बोडस, सचिव सौ. दाक्षायणी बोपर्डीकर व शाळा व्यवस्थापक श्री. दिलीप भातडे व पदाधिकार्यांनी कौतुक केले.