उदयापासून रत्नागिरी जिल्ह्यात नवीन नियमावली-जिल्हाअंतर्गत बस, रिक्षा वाहतूक सलून यांना अटींवर परवानगी

रत्नागिरी दि. २१ : लॉकडाऊन नियमांमध्ये उद्या २२ मे २०२० पासून शिथिलता देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केले . यात जिल्हांतर्गत बससेवा तसेच रिक्षा आणि केशकर्तनालये यांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे. या अंतर्गत दिलेल्या आदेशात क्रीडा संकुल व मैदाने तसेच इतर सार्वजनिक मोकळ्या जागा याठिकाणी सामाजिक अंतर ठेवून वैयक्तिक सरावास परवानगी असेल मात्र समूह आणि प्रेक्षक जमा होतील असे क्रीडाप्रकार आयोजित करण्यास बंदी असेल.तीन चाकी वाहन/ रिक्षा यामध्ये 1 वाहनचालक व 2 प्रवासी अशा मर्यादित सुरू करता येणार आहे. प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के मर्यादेत जिल्हयात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी बस सेवा सुरु करात येईल.सर्व प्रकारची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत सुरू ठेवता येतील.मात्र दुकानांच्या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असेल तसेच दुकानासमोर एकाच वेळी 5 पेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत, असे बंधन राहणार आहे. अत्यावश्यक सेवा व त्याव्यतिरिक्त इतर सेवा यांच्यासाठी ई-कॉमर्सच्या माध्यमातून परविण्यास मान्यता असेल. कुरियर आणि पोस्टाच्या सेवा सुरू राहतील.
केशकर्तनालय, सलून स्पा आदि दुकाने समाजिक अंतर ठेवणे व कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारची दक्षता घेऊन सुरू ठेवता येतील.अंत्यविधी व अंत्ययात्रेच्या वेळी सामाजिक अंतर ठेवून 50 च्या मर्यादेत व्यक्तीना उपस्थित राहता येईल.सर्व शासकीय कार्यालय 100 टक्के उपस्थितीत सुरळीत सुरु ठेवता येतील. या कार्यालयामध्ये मास्क व सॅनिटायझरच्या वापरासह सामाजिक अंतराचे पालन करणे अनिवार्य असेल.
महाराष्ट्र शासनाच्या 19 मे 2020 रोजीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 मधील बदल करणारा हा आदेश शुक्रवार 22 मे 2020पासून लागू असे असे आदेशात म्हटले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button