
अशा दलालांना थेट तुरुंगाची हवा दाखवण्यात येईल, ना. उदय सामंत यांचा इशारा
कोरोना कालावधीत गाड्या भाड्याने लावून चाकरमान्यांना आणण्याचा घाट सिंधुदुर्गात राबवला जात आहे. अशा दलालांना थेट तुरुंगाची हवा दाखवण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी काल सिंधुदुर्गातपत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील सर्व ४३१ सरपंचांचा विमा मी व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून एक वर्षासाठी भरत असल्याचे त्यांनी जाहीर केले.कोरोना संकट कालावधीत प्रशासन व सरपंच यांच्यात समन्वय साधावा. ज्या काही त्रुटी आहेत त्यांच्या निदर्शनास आणून एकमेकांच्या माध्यमातून सोडवण्यात याव्यात, या अनुषंगाने काल पालकमंत्री सामंत यांनी तहसीलदार कार्यालयात सरपंच यांची बैठक घेतली
www.konkantoday.com