
संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक हभप शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या
संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक हभप शिरीष महाराज मोरे (वय 30) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी आज राहत्या घरात गळफास घेत स्वत:चा जीव संपवल्याची माहिती समोर आली आहे.शिरीष मोरे यांनी टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या घटनेने तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.