
पत्रादेवी तपासणी नाक्यावर दारू वाहतुकीवर कारवाई करत २० लाख ३४ हजारच्या दारुसह तब्बल ३२ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
बांदा पोलिसांनी बेकायदा दारू वाहतुकी विरोधात आज मोठी कारवाई केली. सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्याहून गुजरातच्या दिशेने कँटर मधून होणाऱ्या दारू वाहतुकीवर कारवाई करत २० लाख ३४ हजारच्या दारुसह तब्बल ३२ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गाडी तपासणीसाठी थांबविताच काळोखाचा फायदा घेत चालक व क्लिनर फरारी झालेत.गाडीच्या पाठीमागील हौद्यात लोखंडी अँगलच्या खाली गोवा बनावटीच्या दारूचे बेकायदा खोके आढळले. पोलिसांनी २० लाख ३४ हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारूचे २५९ खोके व १२ लाख रुपये किमतीचा कँटर जप्त केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अलीकडच्या काळातील ही बेकायदा दारू वाहतुकी विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे
www.konkantoday.com