
कोकण मार्गावरून धावणार्या नागपूर-मडगांव स्पेशलला सावंतवाडी स्थानकात थांबा.
कोकण मार्गावर आठवड्यातून दोनवेळा धावणार्या नागपूर-मडगांव स्पेशलला अखेर सावंतवाडी स्थानकात थांबा मंजूर झाल्याने प्रवाशांची चिंता मिटली आहे. या स्पेशलला थांबा देण्याच्या प्रवाशांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.नागपूर-मडगाव स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. याचमुळे स्पेशलला मुदतवाढ देण्यात आली आहे. यापाठोपाठच सावंतवाडी स्थानकात थांबा देण्यासाठी पंचक्रोशीतील प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे आग्रह धरला होता. यापूर्वी स्पेशलला सावंतवाडी स्थानकात थांबा देण्यात आला होता.
प्रवाशांचे भारमान असताना देखील अचानक स्थानकातील थांबा रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचा हिरमोड झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांनी पुन्हा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करत थांबा देण्यासाठी प्रयत्न केले होते.www.konkantoday.com