मिरकरवाडा येथे किराणा दुकानासमोर गर्दी दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल
मिरकरवाडा येथील किराणा दुकानासमोर ग्राहकांनी अनावश्यक गर्दी केल्याने अलमाजिद जनरल अॅन्ड किराणा स्टोअरचे मालक मोहसीन हरून पटेल यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पटेल यांचे मिरकरवाडा येथे किराणा मालाचे दुकान आहे.रत्नागिरी शहर पोलिसांचे या भागात पेट्रोलिंग चालू असताना पटेल यांच्या अलमाजिद जनरल अॅन्ड किराणा स्टोअर समोर ग्राहकांनी मोठी गर्दी केलेली दिसली खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना देऊनही ग्राहकांनी अनावश्यक मोठी गर्दी केल्याने पटेलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
www.konkantoday.com