अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मा. शिक्षणमंत्र्यांची मागणी दुर्दैवी, शासनाने या मागणीचा पुनर्विचार करावा : अभाविप
महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री मा.उदय सामंतजी विद्यार्थ्यांच्या भावनांसोबत खेळत आहेत. दि. ८ मे रोजी सांगितले जाते की परीक्षा झाली पाहिजे, आणि गेल्या दोन दिवसांत अनेक विद्यापीठांच्या परीक्षा नियंत्रकांनी पत्र काढून कळवले आहे, कि अंतिम वर्षाचे पेपर 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान होणार आहेत. आणि आज अचानक उच्च शिक्षण मंत्री UGC ला पत्र पाठवून कळवत आहेत कि महाराष्ट्र सरकार अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास असक्षम आहे. हे खूप खेद जनक आहे.
मा.शिक्षण मंत्र्यांच्या एक चुकीच्या निर्णयामुळे साधारण महाराष्ट्रातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या 8 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्येक निर्णय घेतांना आणि वक्तव्य करतांना जबाबदारीने करणे आवश्यक आहे. “या निर्णयामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या नोकरी व व्यवसाय तसेच आगामी पदव्युत्तर शिक्षणावर याचा परिणाम होणार आहे. अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याची मागणी शिक्षण मंत्र्यांनी करणे हे दुर्दैव आहे.” असे कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार म्हणाल्या. तसेच त्याबरोबर या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
१. कोणत्याही विद्यापीठाने, कोणत्याही किव्हा विद्यापीठांच्या कुलगुरुंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केलेली नसताना आणि तज्ञ समितीने जुलै मध्ये परीक्षा घेण्यात याव्यात असे सुचविण्यात आले असूनदेखील माननीय उच्चशिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी ही मागणी करण्याचे कारण काय?
२. तज्ञ समितीने सुचविलेल्या सूचनांच्या आधारावर राज्यातील परीक्षासंदर्भात २० जूनला review घेण्यात येणार होता त्याच काय झाल?
३. देशातील अन्य राज्यामध्ये परीक्षा होणार असून अश्यावेळेसआपल्या राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान का?
४. परदेशात किंवा अन्य राज्यात प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना यामुळे अडचणी निर्माण होतील ?
५. ATKT असलेल्या विद्यार्थ्यांचं काय?
या सर्वच प्रश्नांची उत्तरे मा. शिक्षणमंत्र्यांना द्यावीच लागतील.
All the questions given above are already answered by Uday Ji Samant and Govt.
So there is need not to worry about future of students.
And who told that surely that exams in other states will not cancel… You should also think that maximum Corona patients are only in Maharashtra and day by day they are increasing…
So MSBTE has taken a good decision on time.
All students agreed that and not happy for that exam cancellation but feeling safe.
So Samant ji has taken a good decision and UGC must approve it.