सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केल्यास त्या व्यक्तीला त्याच्या घरातच क्वारंटाईन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई व इतर जिल्ह्यांतील रेड झोनमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास १३हजार लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आल्यानंतर जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईन कक्षांची क्षमता संपल्याने जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रेड झोनमधील पोलिस आयुक्तांना पास देण्यापूर्वी आपली संमती घ्यावी, अशी विनंती रविवारी केली होती. मात्र, सोमवारी कंटेन्मेंट झोनव्यतिरिक्त रेड झोनमधूनही कुणीही व्यक्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश केल्यास त्या व्यक्तीला त्याच्या घरातच क्वारंटाईन करावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकार्यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे आता मुंबईतील कंटेन्मेंट झोनबाहेर असणारे मुंबईकर चाकरमानी सुसाट आपल्या गावी निघणार हे निश्चित आहे.जवळपास पावणेदोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकर चाकरमान्यांचा कोकणातील आपल्या गावी, घरी येण्याचा मार्ग बर्यापैकी सुकर बनला आहे
www.konkantoday.com