नागरिकांच्या सुरक्षितेच्या दुष्टीने नाटे बाजारपेठ आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या कोराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे मुंबईतून मोठय़ा प्रमाणावर चाकरमानीही येत आहेत या सर्वांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढली आहे
शासनाकडून गावात आता चाकरमान्यांना होमकाेराेन्टाइन करण्याचे सुचना देण्यात आले आहेत नाटे गावातील नागरिक व व्यापाऱ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने नाटे गावातील बाजारपेठ सोमवार १८ मे पासून पुढील सोमवारपर्यंत आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायती व व्यापार्यांनी घेतला आहे त्यामधून अत्यावश्यक सेवा म्हणजे औषधाची दुकाने दवाखाने आदींना वगळण्यात आले आहे नाटे गावात देखील मुंबईहून अनेक चाकरमानी आले असून त्यापैकी काही जणांना स्वतंत्र घरात तर काही जणांना पंचायतीने निवडलेल्या ठिकाणी होमकाेराेटाइन करून ठेवण्यात आले आहे या सर्वांमुळे सुरक्षितेच्या दृष्टीने व्यापारी व ग्रामपंचायतीने आठ दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे
www.konkantoday.com