दापोलीत ईद साध्या पध्दतीने साजरी हाेणार,मुस्लिम समाजाचा निर्णय
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दापोली शहरातील मुस्लिम समाजाने यंदा ईद साध्या पध्दतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला असून केवळ मुस्लिम समाजासाठी दापोलीतील दुकाने उघडू नये, असे निवेदन दापोली येथील जामिया जमातुल मुस्लिमीन व नौजवानन-इ-मिल्लत यांच्याकडून प्रशासनाला दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने होत आहे. त्याममुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून सरकारकडून विविध निर्बंध घातले आहेत.
मे महिन्याच्या २४ तारखेच्या दरम्यान मुस्लिम समाजाचा पवित्र सण रमजान ईद येत असून या सणानिमित्ताने दरवर्षा मुस्लिम समाजाकडून मोठया प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी केली जाते. आज देशात कोरोनामुळे अनेक देशवासियांचा मृत्यु झाला आहे. त्याचबरोबर हजारो रूग्ण रूग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. या संकटसमयी मुस्लिम समाजाने रमजान ईद अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करण्याचे ठरवले आहे.
या काळातत दुकाने उघडली गेली नाहीत तर मुस्लिम बांधवांची रमजान ईदच्या निमित्ताने अडचण होईल असा समज निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या ज्या पध्दतीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना घेणे अत्यावश्यक आहे. नागरीकांनी बाजारात गर्दा केली तर कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. फिजिकल डिस्टसिंग पळले गेले नाही तर अनर्थ होऊ शकतो. आम्हाला आपला देश आणि आपले देशबांधव प्रिय आहेत. कोणामुळेही कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये अशी आमची भावना आहे. हे निवेदन दापोलीचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार दापोली व पोलिस निरीक्षक दापोली, मुख्याधिकारी दापोली नगरपंचायत यांना दिले आहे.
www.konkantoday.com