
बिहार निवडणुकीसाठी आयोगाने बिस्कीट हे चिन्ह दिल्यामुळे शिवसेनेनेचा निर्णयावर आक्षेप
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे चिन्ह दिले आहे. नितीशकुमार यांच्या जनता दल पक्षाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने बिस्कीट हे चिन्ह शिवसेनेला दिले आहे. जेडीयू पक्षाचे बाण हे चिन्ह असल्याने मतदारांमध्ये घोळ होतो, अशी तक्रार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे केली होती.
त्यानुसार शिवसेनेला पर्यायी चिन्ह वापरण्याची विनंती केली होती. त्यानंतर ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, गॅस सिलिंडर व बॅट या तीन पर्यायांपैकी एका चिन्हाची मागणी आयोगाकडे शिवसेनेने केली होती. मात्र, आयोगाने बिस्कीट हे चिन्ह दिल्यामुळे शिवसेनेने या निर्णयावर आक्षेप घेत चिन्ह बदलून देण्यासाठी आयोगाला पत्र लिहिले आहे.
www.konkantoday.com