आम्फन’ चक्रीवादळाचा वेग वाढला,२१ मे पर्यंत हे चक्रीवादळ सक्रिय राहण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरातील मध्यवर्ती भागात तयार झालेल्या ‘आम्फन’ चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. या चक्रीवादळाने हवेतील आर्द्रता खेचून घेतली आहे. परिणामी अंदमानपर्यंत दाखल झालेल्या मान्सूनचा वेग थोडासा मंदावला आहे. २१ मे पर्यंत हे चक्रीवादळ सक्रिय राहण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतरच मान्सूनचा पुढील प्रवास सुरू होणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
www.konkantoday.com