
सावर्डेत होणार ‘कोवीड सेंटर’ आमदार शेखर निकम यांचा पुढाकार
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातून आलेल्या चाकरमान्यांना क्वारंटाईन कुठे करायचे, त्यांच्यावर उपचार कसे करायचे, असे प्रश्न आरोग्य प्रशासनासमोर उभे राहिले आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे. क्वारंटाईन, उपचारासाठी नियोजित केलेल्या जागा, हॉस्पिटल आता अपुरी पडू लागली आहेत. त्यासाठी चिपळूण- संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला आहे. सावर्डेलगत वहाळ फाटा येथे सह्याद्री शिक्षण संस्थेने देणगी दिलेल्या जागेत समाजकल्याण विभागाचे मुलींचे वस्तीगृह आहे. या वसतीगृहात शंभर मुली राहत होत्या. आता हे वसतीगृह आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने कोवीड सेंटर म्हणून तयार केले जाणार आहे. याठिकाणी बाहेरून आलेल्यांना करणे, त्यांची तपासणी करणे, पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणे, हे काम येथून जिल्हा आरोग्य विभागामार्फत केले जाणार आहे. या जागेची पाहणी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. बोलाडे यांनी आज सकाळी केली. आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना हे वससतीगृह दाखवले. या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योती यादव, सावर्डेचे सरपंच सुभाष मोहिरे, डाॅ. सानप, डाॅ. अहंकारे, अमित सुर्वे आदी उपस्थित होते. हे समाज कल्याणचे वसतीगृह आता कोवीड सेंटर होणार असल्याने परिसरातील रुग्णांना त्याचा फायदा येणार आहे.
www.konkantoday.com