विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाकडुन जिवदान

रत्नागिरी मार्गावरील हॉटेल हिल पॉईंट येथे संदीप चाळके यांच्या विहिरीत आज संध्याकाळी ६:३० वाजता बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. याची खबर संतोष जाधव आणि परिमल चाळके यांनी वन विभागाला दिली.यानंतर वनविभागाचे अधिकारी आर. सी. भवर , परिक्षेत्रवन अधिकारी प्रियंका लगट यांच्या नेतृत्वाखाली देवरुखचे वनपाल सुरेश उपरे , वनरक्षक सागर गोसावी , एन एस गावडे , शर्वरी कदम, संतोष कदम , दिलीप गुरव यांनी बिबट्याला विहिरीतुन बाहेर काढला.सदरचा बिबट्या मादी जातीचा असून तो एक वर्षाचा असल्याचे सांगण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button