
भाजपचे आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला
कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे व गोट्या सावंत यांच्या अटकपूर्व जामिनावर गुरुवारी निर्णय झाला. 10 तास दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला होता. यात कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला आहे.
नितेश राणे यांना जामीन मिळतो की नाही? याची उत्सुकता होती. आता राणेंवर अटकेची टांगती तलवार आहे. आ. राणे यांनी जिल्हा न्यायालयात अॅड. राजेंद्र रावराणे आणि अॅड. संग्राम देसाई यांच्या माध्यमातून धाव घेतली. या अटकपूर्व जामिनावर पहिली सुनावणी 27 डिसेंबर रोजी झाली होती. यानंतर उर्वरित सुनावणी 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर रोजी झाली आहे. आता यावरचा निर्णय 30 डिसेंबरला झाला.
www.konkantoday.com