
रेड झोन मधून आलेल्या चाकरमान्यांना संकल्प युनिक फाउंडेशन चा आधार
मुंबई, पुणे,सांगली, बारामती अशा रेड झोन मधून रत्नागिरी त आलेल्या चाकरमान्यांना तपासणी साठी रत्नागिरी येथील दामले विद्यालयात यावे लागते. एक तर ते रेड झोन मधून त्रास सहन करुन,कसा बसा 10/12 तासांचा प्रवास करून तपासणी साठी रणरणत्या उन्हात तासंतास आपल्या मुलांना, वयोवृद्ध यांना घेवून उभे रहावे लागते.साधं पाणी सुध्दा मिळत नाही याची दखल रत्नागिरी येथील सामाजिक संस्था *संकल्प युनिक फाउंडेशन यांनी देखील घेतली.आणि या कामी शोएब बंदरकर,सवूद मोहिद्दीन कापडी,मोअज्जम लांजेकर, अकबर मुजावर, भुषण शेट्ये,इबझान चौगुले,शाद बंदरकर सह तसव्वर खान, युसुफ शिरगावकर, शकील गवाणकर आदिंनी दामले विद्यालयात सुमारे 300 लोकांना पाणी बॉटल, बिस्किटे,केळी दिली.सकाळ पासून पाण्याचा थेंबही न मिळालेल्या या लोकांना हायसे वाटले आणि त्यांनी संकल्प युनिक फाउंडेशन चे आभार मानले. दररोज अशा प्रकारे आम्ही चाकरमान्यांची अशी सोय करू असे या संस्थेचे अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी सांगितले.
www.konkantoday.com