रत्नागिरी जिल्हयात १७ रुग्णांची कोरोनावर मात
रत्नागिरी जिल्हयात कोरोना पॉझिटिव आलेल्या १७ रुग्णांना उपचारा नंतर घरी सोडण्यात आले आहे.या १७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने जिल्हावासीयांना ही दिलासादायक बातमी आहे.
मिरज येथून ११९ रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत यामध्ये ९९ अहवाल संगमेश्वर १० अहवाल मंडनगड व १० अहवाल लांजा येथील आहेत.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ऐकुण पॉझिटिव रुग्णांची संख्या ९२ इतकी आहे.या मध्ये उपचारानंतर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या १७ व मृत्यू पावलेल्या रूग्णांची संख्या ३ इतकी आहे.आज अखेर एकूण ॲक्टिव्ह कोेरोनाबाधीत रुग्णांची संख्या ७२ इतकी आहे.यामध्ये उपचारा खाली असणाऱ्या ७२ जणांचे विवरण खालीलप्रमाणे रत्नागिरी ३६, कळंबणी ४, दापोली १४, गुहागर १, मंडणगड ११, कामथे ३ आणि चिपळूण ३ अशी आहे.
www.konkantoday.com