चाकरमान्यांना पास देताना स्थानिक प्रशासनाला कळवावे व पासची संख्या कमी करावी
मुंबईहून कोकणात येणार्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांची व्यवस्था करताना जिल्हाप्रशासनाची तारांबळ उडत आहे. अनेक प्रवासी विनापास, विनापरवानगी येत असल्यामुळे गोंधळात भर पडत आहे. चाकरमान्यांना पास देताना स्थानिक प्रशासनाला कळवावे असे पत्र रत्नागिरी जिल्हाधिकार्यांनी शासनाकडे पाठवले आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे अनेक चाकरमानी गावाकडे परतू लागले आहेत. जिल्हाप्रशासनाकडून दरदिवसाच्या नोंदी घेण्याचे काम सुुरु आहे. शनिवारी एका दिवशी नऊ हजार चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. त्यातील काहीजणं विना परवानगी आले आहेत. वाढत्या लोकांमुळे क्वॉरंटाइनची क्षमता संपत आहे.
दररोज मुंबईकरांना कोकणात येण्यासाठी दिल्या जाणार्या पासची संख्या कमी करावी असे पत्र राज्याच्या पोलिस आयुक्तांना जिल्हाधिकार्यांनी दिले आहे. स्थानिक आणि चाकरमानी यांच्यासाठी आरोग्य यंत्रणेचा समन्वय आणि साधणे हा त्याचा उद्देश आहे. यामध्ये विरोध करण्याचा प्रश्न येत नाही, असे ना. उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
www.konkantoday.com