
कडवईमधील मंडप व्यवसायिक शाहीर विजय कुवळेकर यांनी मुंबईतून येणा-या कडवई गावातील लोकांसाठी भव्य शेड बांधली
संगमेश्वर तालुक्यातील कडवईमधील मंडप व्यवसायिक, कुणबी समाजातील अभ्यासू पदाधिकारी आणि कलाक्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले शाहीर विजय कुवळेकर यांनी मुंबईतून येणा-या कडवई गावातील आपल्या वाडीतील लोकांसाठी स्वत:चे गोडावुन असलेल्या मैदानात भव्य शेड बांधली. मुंबईतुन येणा-या लोकांची सर्व व्यवस्था, त्यांची व स्वत:ची काळजी घेऊन वाडीतील सर्व मंडळी सहकार्य करणार आहेत. सामाजिक बांधिलकीचा एक आगळावेगळा उपक्रम त्यानी राबवला आहे.
www.konkantoday.com