आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांचे जिल्ह्यात घरोघरी वाटप-ना.उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही अफवा न पसरवता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्यांमुळे प्रतिकारशक्ती वाढते. रत्नागिरी जिल्हयातील सुमारे साडेचार लाख कुटूंबांना या गोळ्यांचे मोफत वाटप जिल्हाप्रशासन करणार आहे, अशी माहिती ना.उदय सामंत यांनी दिली.आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी गोळ्या व्यक्तींमधील प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. आज देशभरात याला मागणी आहे; मात्र संपूर्ण जिल्ह्यात घरोघरी या गोळ्या वाटप करणारा रत्नागिरी जिल्हा पहिला आहे. याचे नियोजन जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयुष विभागाकडून केले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गतील एकही कुटुंब वंचित राहू नये अशी व्यवस्था केली असून आशा वर्करच्या माध्यमातून घरोघरी वाटप होईल. कोविड फंडातून यासाठीचा खर्च केला जाणार आहे. गोळ्यांची उपलब्धता कमी असेल तर दोन टप्प्यात याचे वाटप होईल. या गोळ्या तीन दिवस सकाळी उपाशी पोटी तीन घ्यावयाच्या असून याची माहिती गोळ्या वाटप करताना देण्यात येणार आहे. या गोळ्यांमुळे खूप चांगले परिणाम होतो आपली प्रतिकार शक्ती निश्चितच वाढते. कोरोनापासून बचावासाठी ही उपाययोजना केली जात आहे.
www.konkantoday.com