६० खाजगी बसेस खेड येथील गोळीबार मैदानातं उभ्या
मुंबई तून मोठ्या प्रमाणात चाकरमानी येऊ लागल्याने जिल्हाधिकारी मिश्रा यांनी कडक नाकाबंदी चे आदेश दिले असून कोकणात सोडून मुंबई ला जाणाऱ्या ६० खाजगी बसेस खेड येथील गोळीबार मैदानातं उभ्या करून ठेवल्या आहेत.पास असल्याचे सक्ती चे केल्यावर अनेक बिना पास प्रवास करण्याऱ्या ना आता चाप बसणार आहे तसेच खाजगी बसेस वाले जे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग वडाप करत होते त्यांना ही मोठा दणका बसणार आहे.
कारण चाकरमानी किती हीं पैसे मोजून गावाकडे येत आहेत आणि त्यात किती पॉजिटीव्ह असतील हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळे यातील बस मालक कसलीही काळजी न घेता केवळ धंदा आहे म्हूणन हजारो बस घेऊन येत आहेत.
आता दोन्ही जिल्हाधिकारी यांच्या परवानगी नेच अधिकृत पास धारक जिल्ह्यात प्रवेश करू शकणार आहे त्यामुळे कोण कोठून आले आहे याची माहिती व नोद ठेवणे शक्य होणार आहे आता फक्त मुंबई तून येणाऱ्या लोकांना तपासून आत सोडल जात आहे.
www.konkantoday.com