मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली
विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह बिनविरोध निवड झालेल्या ९ सदस्यांनी सोमवारी दुपारी सदस्यत्वाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे रणजित सिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांनी आज शपथ घेतली.
www.konkantoday.com