
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी दोन रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने डिस्चार्ज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना आज जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. वायगंणी ता. वेंगुर्ला व जांभवडे ता. कुडाळ येथील दोन व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यावेळी उपस्थित आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी टाळ्या वाजवत शुभेच्छा देत त्यांचे कोरोनामुक्त झाल्याबदल अभिनंदन करुन शासकीय रुग्णवाहिकेत बसवून त्यांना घरी सोडले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनजंय चाकुरकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. अविनाश नलावडे, फिजिशियन डॉ. नागेश पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एम. मोरे, मेट्रन आर. जी. नदाफ तसेच डॉक्टर्स, नर्स पॅरामेडीकल स्टाफ उपस्थित होते.
www.konkantoday.com