
पोपटावरून घुडेवठारात झाली हाणामारी
रत्नागिरी शहरातील घुडेवठार येथे पोपट उडून गेल्याच्या कारणातून तिघांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. कुंदन नामदेव घुडे यांनी याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोन संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंदन घुडे याच्या घरात असणारा पोपट १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उडून गेला. हे बघण्यासाठी शेजारी राहणारा नितीन निसाद व अन्य एकाला पाठविले होते. या कारणातून कुंदन घुडे यांचा मुलगा साईराज, नितीन निसाद व नसीब गोसावी यांना बावा वारंग व पिंट्या वारंग यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला. www.konkantoday.com