
रत्नागिरी जिल्ह्यात आज आणखी ६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
रत्नागिरी जिल्ह्यात मिरज येथे पाठवण्यात आलेल्या ऐकुण २७० अहवाल प्राप्त झाले त्यात ६ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.ह्या पॉझिटिव्ह आलेल्या ६ अहवालांपैकी दापोली येथील ५ अहवाल व कळंबणी उपजिल्हा रुग्णालय येथील १ पॉझिटिव्ह अहवाल आहे. पॉझिटिव आलेल्या अहवालांपैकी १ रुग्ण मुरडव येथील तर ४ रुग्ण कोंडे शिगवण या गावातील तर १ रुग्ण कोलतर कोंड येथील आहे.यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९२ झाली आहे.
www.konkantoday.com