
महाराष्ट्रातील लॉकडाउन आता ३१ मे पर्यंत
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन राज्य सरकारनं ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. लॉकडाऊन लागू असूनही राज्यातील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मात्र तिसरा लॉकडाऊन संपत असताना राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला. राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्या १८ हजारांहून जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
www.konkantoday.com