
देवरुख आणि रत्नागिरीतील हम ग्रुप तसेच मुस्लिम समाजाने रमजान ईदसाठी पैसा खर्च न करता निराधारांना आधार दिला
देवरूख आणि रत्नागिरीतील हम ग्रुप तसेच मुस्लिम समाजाने सामाजिक बांधिलकी जपत रमजान ईदसाठी आपल्यासाठी पैसा खर्च न करता निराधारांना आधार देण्यासाठी कपडे खरेदी करून त्याचे वाटप केले. त्याचा प्रारंभ देवरूख येथील मातृमंदिर संस्थेच्या गोकुळ बालिकाश्रमातील १० मुलींना कपडे वाटप करून करण्यात आला.
हम ग्रुपकडून दरवर्षी सार्वजनिक ईद साजरी केली जाते. या ईदसाठी हिंदू, मुस्लिम व सर्व समाजातील लोक एकत्र येऊ ईद साजरी करतात. यावर्षी सार्वजनिक ईद साजरी करायची नाही, असे ठरवण्यात आले. मुस्लिम समाजातर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अनाथाश्रम, गरजू व गरीब लोकांना कपडे दान करायचे ठरवण्यात आले.त्याची सुरुवात गोकुळ संस्थेमधून करण्यात आली, अशी माहिती कपडे वाटप कमिटी अध्यक्ष नुरुल सिद्दिकी यांनी दिली..
यावेळी सरताज कापडी, नुरूल सिद्दिकी, रज्जाक बोधले, डॉ. शेख, नविद कापडी, शमसूल सिद्दिकी, अशफाक जेठी उपस्थित होते.
www.konkantoday.com