दुकानासमोर गर्दी केल्याने रत्नागिरी बाजारपेठेतील तीन दुकान चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी शहरामध्ये गेल्या तीन दिवसापासून शासकीय नियमांनुसार बाजारपेठ सुरु करण्यात आली. पहिल्या दिवशी बाजारपेठेत फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता . मात्र गेल्या दोन दिवसापासून खरेदीसाठी येणार्‍या नागरिकांची संख्या वाढली आहे.दुकानासमोर ग्राहकांची गर्दी करू देऊ नका त्यांच्या सुरक्षित अंतर ठेवा अशा सूचना दुकानदारांना देण्यात आल्या आहेत किरणा व्यापारी व जनरल स्टोअर्समध्ये व कापड व मेडिकल स्टोअरमध्ये सातत्याने गर्दी होताना दिसत आहे.. पोलिसांनी सूचना देऊनही तेवढ्यापुरतीच नियमांचे पालन केले जाते. मात्र पोलीस व अधिकारी गेल्यावर दुकानात खरेदीदारांची ही झुंबड उडताना दिसत आहे. शनिवारी रत्नागिरी पोलिसांनी दुकानासमोर गर्दी झाल्याने राधाकृष्ण नाका ते धनजी नाका या परिसरातील तीन दुकानांवर कारवाई केली
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button