
चाकारमान्यांना आरोग्य तपासणी करून शक्यतो घरातच पाठवले जाईल- जि प अध्यक्ष रोहन बने
कोरोना बाबत, प्रशासन व जि प ,पं स सदस्य यांची जिल्हयातील पहिली समन्वय सभा जि प अध्यक्ष रोहन बने यांच्या उपस्थित आज देवरूखात संपन्न झाली जिल्हाधिकारी साहेबांच्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्याचा निर्णय,तीन गावांसाठी एक खासगी रूग्णवाहिका ठेवण्याचा निर्णय,जेणेकरून रूग्णाना त्वरीत उपचार मिळावेत गरज भासल्यासच हे वाहन वापरावे ,काही वेळा 108 .उपलब्ध झाली नाही तर चाकरमान्यानी बाजारात तसेच गावात फिरू नये ,सध्या बाजारात मुंबई ,ठाणे, नवीमुंबई,पुणे आदी पासिंगच्या गाडया फिरताना दिसत असल्याचे अनेकांनी सांगितले ,त्यांच्या वाहनाची चावी काढून 14 दिवस गावकृती दलाकडे द्यावीत अशी चर्चा झाली चाकारमान्यांना आरोग्य तपासणी करून शक्यतो घरातच पाठवले जाईल,जर गरज भासल्यास शाळा , अंगणावाडी ,समाज मंदीर ,येथे ठेवण्याचा निर्णय त्याचबरोबर तेथे फवारणी व स्वच्छता गाव कृती दलाने करावी गावात सामाजिक सलोखा राहील याचा प्रथम प्रयत्न करण्याच्या रोहन बने यांच्या सुचना ,त्याचबरोबर प्रत्येक गावाचा प्रशासनाला सोबत घेवुन आढावा घेण्याचा सुचना या वेळी जि प अध्यक्ष रोहन बने यांच्यासह माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे महिला व बालकल्याण सभापती रजनी चिंगळे , सभापती बंडा महाडिक,राजापूर- लांजा विधानसभा क्षेत्रप्रमुख जयाशेठ माने तहसिलदार ,गटविकास अधिकारी ,सर्व विभागाचे खातेप्रमुख ,विस्तार अधिकारी सर्व जि,प सदस्य ,पं स सदस्य उपस्थित हाेत
www.konkantoday.com