
गोव्यात राज्याबाहेरून येणारे कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली
दिल्लीहून रेल्वेने गोव्यात आलेले आणखी ८ ते १0 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, अंतिम अहवालाच्या प्रतीक्षेत आरोग्य खाते आहे. या रुग्णांच्या बाबतीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर गोव्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या २६ वर पोहोचेल. राज्याबाहेरून येणारेच पॉझिटिव्ह सापडत असल्याने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गोव्यात राज्याबाहेरून येणारे कोरोना पॉझिटिव्ह सापडत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. राज्यात एकाच दिवशी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गोवा ग्रीन झोनमध्ये होता, परंतु आता ही रुग्णांची वाढत जाणारी संख्या पाहता रेड झोनमध्ये जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शनिवारी दिल्लीहून आलेल्या रेल्वेतून मडगाव रेल्वे स्थानकावर उतरलेल्या तीन प्रवाशांची रॅपिड टेस्टमध्ये पॉझिटिव्ह चाचणी आली होती. गोमेकॉत पुन्हा तपासणी केली असता यावर शिक्कामोर्तब झाले. या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या तिघांनाही मडगाव येथील कोविड इस्पितळात हलविण्यात आले आहे. दिल्ली-गोवा रेल्वेतून आलेल्या आणखी ५६ प्रवाशांच्याही चाचण्या करण्याvत आल्या असून, अहवाल व्हायचा आहे. दरम्यान, आणखी ८ ते १0 रुग्ण टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले.
www.konkantoday.com