रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले,आज आणखी ४ कोेरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले
मिरज येथे पाठवलेल्या तपासणी नमुन्यांपैकी ४ अहवाल प्राप्त झालेले आहेत हे सर्व ४ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत .यातील ३ रुग्ण कामथे येथे तर १ रुग्ण कळंबणी येथे संस्थात्मक क्वारंटाइन होता.कामथे येथील ३ रुग्ण कापरे तालुका चिपळूण येथील रहिवासी असून कळंबणी येथील रुग्ण हा संगमेश्वर येथील रहिवासी आहे. या चारही जणांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. यामुळे आता जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्हची संख्या ८६ झाली आहे.
www.konkantoday.com