योजक उद्योग समूहाचे संस्थापक व ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब भिडे यांचे दुःखद निधन
रत्नागिरीतील प्रसिद्ध योजक उद्योग समूहाचे संस्थापक व ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब भिडे (९१) यांचे आज त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले
नानासाहेब भिडे रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक होते सुरुवातीच्या काळात गोखले नाक्यावरील भिडे उपहार गृह त्यानी अनेक वर्षांपूर्वी चालू केले होते त्यानंतर त्यानी कोकणातील पदार्थांना मान्यता मिळावी यासाठी योजक उद्योग समूहाची स्थापना केली कोकणातील आंबा ,काजू ,करवंदे कोकम यावरील प्रक्रिया उद्योग त्यांनी मोठ्या कष्टाने उभारला व त्यांची योजकची प्रॉडक्स संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली कोकणात आलेला पर्यटक योजकची प्रॉडक्ट्स खरेदी केल्याशिवाय परत जात नाही हे त्यांच्या यशाचे गमक होते रत्नागिरीसह योजक उद्योग समूहाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपला व्यवसाय वाढविला आहे या सर्वांमागे नानासाहेब भिडे यांचे कष्ट होते योजक उद्योग समूहाचा भार त्यांचे पुत्र आनंद , श्रीकांत ,किशोर आदी जणांनी यशस्वीरित्या सांभाळला आहे
नानासाहेब यांची नात शमिका ही प्रसिद्ध गायिका आहे .नानासाहेब भिडे यांच्या दुःखद निधना मुळे उद्योग क्षेत्रातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे.
www.konkantoday.com