माटे कुटुंबीयांतर्फे चिपळुणात मोफत झुणका-भाकर केंद्र

लॉकडाऊन काळात गरजूंना सेवा देण्याचा मनोवृत्तीतून कामथेचे सरपंच विजय माटे आणि कुटुंबीयांतर्फे चिपळुणात गोरगरीब गरजूंसाठी झुणका-भाकर केंद्र सुरू केले आहे. माटे कुटुंबीयांतर्फे दरवर्षी श्रावण महिन्यात मोफत अन्नदानाचा देखील उपक्रम राबविला जातो. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अनेक गरजू व गरिबांची भूक भागविण्याचे काम या उपक्रमातून होणार आहे. स्व.बाळ माटे यांचा समाजसेवेचा वारसा जोपासत विजय माटे यांनी १५ मे ते १५ जून या कालावधीत शहर परिसरातील गरजू व गरिबांना मोफत झुणका-भाकर देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तरी याचा गरजूंना लाभ घ्यावा, असे आवाहन विजय माटे यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button