मतदार संघाचा पालक म्हणून मला माझी जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव – आ.योगेश कदम
दापाेली तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा आकडा बघता तालुक्यातील लोकसंख्येच्या मानाने तो खूपच मोठा असला तरी कोरोना बाधीत लोक हे स्थानिक नसून मुंबईतील आलेले चाकरमानी आहेत. अर्थात तेही बांधव आपलेच असल्याने आपण त्यांना हुसकावून लावणार नाही. मुंबईतून येणार्यांना कोणीही रोखू नका मात्र आपापली काळजी घेत प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाला पळवून लावणे ही एकाची नव्हे तर एकीचीच जबाबदारी असल्याचे मत आ.योगेश कदम यांनी व्यक्त केले.
कोरोना हे संसर्गाद्वारे पसरणारे संकट आहे. यासाठी आपला एकमेकांशी संपर्क येऊ नये म्हणून कोरोनाच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जारी केला आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची गैरसोय होत आहे. मात्र शासनाने हे कशासाठी केले हे समजून घेतले पाहिजे. लॉकडाऊनच्या पहिल्या काळापासून मी सर्वांशी संपर्क ठेवून आहे. अधिकार्यांकडून दर दिवशीचा आढावा घेत आहे. राजकारणाची ही वेळ नसून आज मी या तालुक्याचा पालक म्हणून मला माझी जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.
www.konkantoday.com