तपासणी साठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात तब्बल १४ तास उपाशी असलेल्या चाकरमान्याची संकल्प युनिक फाउंडेशन रत्नागिरी यांनी घेतली दखल
मुंबई, पुणे येथून रत्नागिरी त आलेल्या चाकरमान्यांना तपासणी साठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात यावे लागते.रात्रौ ९वाजता आलेल्या या चाकरमान्यांना दिवसभर रांगेत उभे रहावे लागले.लहान मुले, वयोवृद्ध,महिला,पुरुष असे दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे १२०० चाकरमानी उपाशी होते..तसा मेसेज एका व्यक्तीने संकल्प युनिक फाउंडेशन*यांच्या पदाधिकारी यांना पाठवला ही बाब रत्नागिरी येथील उद्योजक शोएब शकील बंदरकर यांना समजली त्यांनी लगेच संकल्प युनिक फाउंडेशन कडे मी यासर्व लोकांना फराळ देतो असे सांगितले…आणि संकल्प युनिक फाउंडेशन ची टीम रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचली. शोएब बंदरकर यांनी सुमारे १२००लोकांना पुरेल इतकी कलिंगडे,चिकू,टरबूज,केळी आणली ही सर्व वाटप करण्यात आली.यावेळी शोएब बंदरकर यांचे मित्रमंडळी सह संकल्प युनिक फाउंडेशन चे अध्यक्ष दिलावर कोंडकरी, उपाध्यक्ष शकील गवाणकर, सचिव युसुफ शिरगावकर, खजिनदार सयीद मुल्ला, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, इरफान शहा यांचे सह तसव्वर खान यांनी सहकार्य केले.
या कामी फळांची वाहतूक करण्यासाठी राजा अॅम्ब्युलन्स चे तनवीर जमादार, जुबेर जमादार यांनी मदत केली.
तब्बल १४ तास उपाशी असलेल्या आणि रणरणत्या उन्हात उभे राहणा-या चाकरमान्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून संकल्प युनिक फाउंडेशन व शोएब बंदरकर यांचे आभार मानले.
www.konkantoday.com