
वाडीस्तरावर कृतीदल स्थापन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू -जि.प.अध्यक्ष-रोहन बने
मुंबई-पुण्यातून येणारा चाकरमान्यांचा वाढता ओघ लक्षात घेऊन करोनाविषयक माहिती घेण्यासाठी वाडीस्तरावर कृतीदल स्थापन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी दिली.
गेल्या आठ दिवसांमध्ये मुंबईकर चाकरमानी गावाकडे परतू लागले आहेत. सध्या मुंबईत करोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे बाधित व्यक्तींची रत्नागिरी जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी वाडी स्तरावर कृती दल स्थापन करण्याची सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केली होती. त्यादृष्टीने प्रशासनाच्या येणार्या सूचनांचे काटेकोर पालन केले जाणार आहे.जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणार्या. सूचनांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत करण्याची मोठी जबाबदारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर आहे. गावात येणार्याा परजिल्ह्यातील लोकांवर लक्ष ठेवणे, त्यांची माहिती प्रशासनाला कळवणे ही जबाबदारी आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका करत आहेत. चाकरमानी वाढत असल्यामुळे वाडीवर कृती दल स्थापन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com