रत्नागिरी शहरात आरडीसी बँकेची दहा लाखांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी शहरातील आरडीसी बँकेच्या आयडेन्टिटीचा गैरवापर करून अज्ञात इसमाने बँकेची ऑनलाइन दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिस स्थानकात आरडीसी बँकेचे डेप्युटी मॅनेजर योगेश गजानन मोरे यांनी केली आहे.

फिर्यादी मोरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार आरडीसी बँकेचे खाते आयडीबीआय बँकेत आहे ज्यावेळी आरडीसी बँकेचे काम आयडीबीआय बँकेत करायचे असते तेव्हा आरडीसी बँक आयडीबीआय बँकेला फाइल पाठवते आरडीसीसी बँक आरटीजीएस व एनएफटी करायची असेल तर ऑनलाइन फाइल आयडीबीआय बँकेत पाठवते दिनांक
४/५/२०२०रोजी दहा लाख रुपये संदर्भात कोणतीही फाइल आयडीबीआय बँकेत ऑनलाइन पाठवलेली नसताना कोणीतरी अज्ञात इसमाने आरडीसीसी बँकेचे असलेल्या खात्यावरून बनावट युनिक आयडी साइन वापरून ते खरे आहे असे भासवून बँकेच्या आयडेन्टिटीचा गैरवापर करून व ट्रांजेक्शन करून बँकेची दहा लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली हा प्रकार रत्नागिरी येथील आरडीसी बँकेच्या जयस्तंभ येथे घडला रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button