रत्नागिरी जिल्ह्य़ातील आशा वर्कर्सना १३५० व सिव्हिल हॉस्पिटल मधिल नर्सेस साठी २५० फेस प्रोटेक्शन शिल्ड
कोरोना संक्रमणाचा धोका जिल्ह्यात वाढला आहे . गावपातळीवर काम करणाऱ्या आशा वर्कर्स व जिल्हा रुग्णालयातील नर्सेस यांचा प्रत्यक्ष संपर्क कोरोना रुग्णांशी येत असतो .त्याची सुरक्षा लक्षात घेऊन ,मा अध्यक्ष शरद पवार साहेब याच्या मार्गदर्शना खाली रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सरचिटणीस डॉ .सतिशराजे सुर्वे यांच्या माध्यमातुन रत्नागिरी जिल्ह्य़ातील आशा वर्कर्सना देण्याकरिता १३५०फेस प्रोटेक्शन शिल्ड व सिव्हिल हॉस्पिटल येथील नर्सेस ना वापरण्याकरिता २५०फेस प्रोटेक्शन शिल्ड देण्यात आली .प्रसंगी उपस्थित जिल्हा.आरोग्य अधिकारी डॉ .कमलापूरकर , सिव्हिल सर्जन डॉ .बोल्डे , डॉ .सुभाष चव्हाण , माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे ,माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर , शहरअध्यक्ष निलेश भोसले , उपाध्यक्ष सनिफ गवांणकर , युवक अध्यक्ष मंदार नैकर , सूरज शेटे .व स्टाफ उपस्थित होता .
www.konkantoday.com