
मुंबईतून गावी येणार्या व विलगीकरणात ठेवलेल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या -माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम
मुंबईतून गावी येणार्या व विलगीकरणात ठेवलेल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना माजी मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी बुधवारी खेड येथे नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आयोजित बैठकीत केली. यावेळी आमदार योगेश कदम यांच्यासह जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी देखील अधिकार्यांसोबत कोरोना परिस्थितीची माहिती घेऊन सूचना केल्या.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे आदींसह खेड, दापोली व मंडणगड तालुक्यातील सर्वच अधिकारी, विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होतेदापोली, खेड व मंडणगड या तिन्ही तालुक्यांमधील हजारो लोक नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहेत. कोरोना महामारीमुळे त्यांना स्थलांतर करून त्यांच्या कोकणातील गावी यावे लागते आहे. येथे त्यांच्या आरोग्य तपासणी व कोरोना तपासणीसाठी प्रशासन चांगले काम करत आहे. राज्य सरकारही या परिस्थितीत जनते सोबत आहे. कशेडी घाट जिल्ह्याचे प्रवेशद्वार असल्याने तेथून जिल्ह्यात येणार्यांची गर्दी होऊन प्रशासनावर ताण येत होता. मात्र, आता केवळ खेड मधील नागरिकांची तपासणी कशेडी घाटात तर जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील नागरिकांची तपासणी त्याच्या तालुक्यात प्रवेश करताना केली जात आहे. यामुळे काहीअंशी कशेडी येथे ताण कमी झाला असला तरी नागरिकांना वीस मिनिटांपेक्षा जास्तवेळ तेथे तपासणीसाठी थांबावे लागू नये यासाठी दोनपेक्षा जास्त डॉक्टर व आरोग्य कर्मचारी कशेडी घाटात नेमण्याची मागणी यावेळी रामदास कदम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली
www.konkantoday.com