
अखेर मद्यप्रेमींचे ग्रहण सुटले, मद्य विक्रीची दुकाने आजपासून सुरू
रत्नागिरी शहरात अनेक दिवस मद्यप्रेमींना हुलकावणी देणारी मद्य विक्रीची दुकाने अखेर आजपासून सुरू झाली आहेत. कित्येक दिवस ही दुकाने आदेश प्रति आदेशा मुळे ही दुकाने सुरू झाली नव्हती अनेक वेळा सुरू होणारअशी वृत्ते आल्याने दुकानासमोर मद्यप्रेमींची गर्दीही केली होती परंतु कोणत्यां ना कोणत्या कारणामुळे ही दुकाने सुरू झाली नसल्याने मद्य प्रेमींमध्ये निराशा पसरली होती.इतर जिल्ह्यात दुकाने सुरू होत असल्याच्या बातम्या एकूण रत्नागिरीत दुकाने कधी सुरू होणार अशी त्यांना प्रतीक्षा होती अखेर आजपासून प्रियांका वाईन मार्ट हे दुकाने प्रत्यक्ष सुरू झाल्याने मद्य प्रेमींनी त्याला तातडीने प्रतिसादही दिला.येणाऱ्या ग्राहकांकडून त्याचे नाव व इतर माहिती भरून घेतली जात असून आणि मगच त्यांना मद्य पुरवठा करण्यात येत आहे.तसेच जे दुकानात येऊ इच्छित नाही त्यांच्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपणही सरकारी महसुलात भर घालण्यासाठी खारीचा वाटा उचलल्याबद्दल मद्यप्रेमींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. शहरातील इतर मध्ये दुकाने आज दुपारपासून सुरू होणार असल्याचे कळते.
www.konkantoday.com
