लॉकडाऊनचा फायदा उठवत स्टेट बँक कॉलनी नजीक अनधिकृत बांधकामांना सुरुवात
रत्नागिरी मिर्या-नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर आहे. मात्र या मार्गावर स्टेट बँक कॉलनीनजीक जागेवर काही नागरिकांनी जाणीवपूर्वक अनधिकृत बांधकामे सुरू केली आहेत. ही बेकायदेशीर बांधकामे हटवावीत, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
स्टेट बँक कॉलनीजवळून जाणार्या या रस्त्यावर अशी बांधकामे उभी राहत आहेत. काही बांधकामे पूर्ण झाली आहेत. अशी बांधकामे करून रस्ता चौपदरी होत असताना अडथळे निर्माण करून गैरफायदा घेण्याच्या इराद्याने हे कृत्य केले जात आहे. तरी ही अनधिकृत बांधकामे हटवण्यात यावीत, अशी मागणी भाजपने केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हेही झाला आहे. जागा अधिग्रहीत करण्याचीची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे ही बांधकामे हटवा, अशी भूमिका भाजपने घेतली आहे.