मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत १३पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने जाहीर केले आहे. सोमवारी ते सदस्यत्वाची शपथ घेतील.गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी), प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी), रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी), उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी). राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांची विधानपरिषदेवर निवड झाली आहे.
www.konkantoday.com