
टेम्पोतून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
राज्यात काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने कडक नियम अं मलात आणले आहेत वाहतुकीसाठी जिल्ह्याच्या सीमा बंद केल्याआहेत असे असताना केवळ आंबा वाहतुकीच्या व अन्य माल वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे त्याचा फायदा घेत आंब्याच्या टेम्पोमधून प्रवासी आणणाऱ्या टेम्पो चालक कृष्णा सुरणकर राहणार कुवारबाव व रफिक मुल्ला राहणार एमआयडीसी यांच्या सह टेम्पोतून प्रवास करणाऱ्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईमधून आलेला या दोन महिलांपैकी एक महिला कर्ला येथील तर दुसरी महिला सोमेश्वर येथील होती दोन दिवसांपूर्वी या महिलांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह होती त्यामुळे त्या आलेल्या टेम्पोचा शोध सुरू होता त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी काल टेम्पो चालकांना शोधून त्यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com