
कळझोंडीत बिबट्याच्या हल्ल्यात पाड्याचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील मौजे कळझोंडी येथील कष्टकरी गरीब शेतकरी किशोर रामचंद्र पवार यांच्या मालकीचा दोन वर्षांचा पाडा बिबट्याने हल्ला करून जागीच ठार मारल्याने कळझोंडी गावासह इतर भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन वर्षाच्या पाड्यावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. मुक्तसंचार करणार्या बिबट्याचा वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील जनतेतून होत आहे.
www.konkantoday.com