सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा फेर तपासणी अहवाल निगेटिव्ह
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा फेर तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.त्यामुळे आता सिंधुदुर्गवासीयांच्या दृष्टीने ही दिलासादायक बातमी आहे.आंबा वाहतूक करणारा चालक म्हणजेच जिल्ह्यातील तिसरा कोरोना बाधीत रुग्ण व मुंबईवरून आलेला एक युवक अर्थात जिल्ह्यात आढळलेला चौथा बाधीत रुग्ण, या दोन रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल फेरतपासणीमध्ये आज निगेटिव्ह आले आहेत. त्यांना अद्याप रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले नाही. आणखी काही दिवस त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे अशी माहीती जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिली.
www.konkantoday.com