विहिरीत पडलेले काढणं काढताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
चिपळूण मिरजोळी परिसरात विहिरीत पडलेल काढणं काढताना तेथून जाणाऱ्या विजेच्या वायरचा स्पर्श झाल्याने प्रेम जाधव या तीस वर्षांच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिरजोळी बौद्धवाडी येथे असणा-या विहिरीमध्ये पडलेलं काढणं वर काढण्यासाठी प्रेम याने लोखंडी शिगेचा वापर केला. या विहिरीच्या वरून थ्री फेज वीज वाहिनी गेली आहे. या वाहिनीला शिगेचा स्पर्श झाल्याने प्रेम याला विजेचा जोरदार धक्का लागला व यातच त्याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com