रत्नागिरी जिल्ह्यात काेविड टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार
जिल्हा प्रशासनाने पंधरा दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात काेराेनाच्या परिस्थितीवर चांगलीच पकड मिळवली होती.गेले दीड दोन महिने रत्नागिरीकर जिल्ह्यातील नागरिकांनीही प्रशासनाला चांगले सहकार्य केल्याने जिल्हा पातळीवर काेराेनाला त्यामानाने रोखण्यात यश आले होते.त्यानंतर चाकरमान्यांना रत्नागिरी जिल्ह्यात आणण्याचा निर्णय झाला सत्ताधारी पक्षातील तसेच इतर पक्षातील अनेक लोकप्रतिनिधींनी तशी मागणीही केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आले तर त्याच्या उपाययोजनांबाबत वरवरचे निर्णय झाले. चाकरमान्यांसाठी एसटीने वाहतूक करण्याबाबतचा निर्णय अद्याप स्थगित ठेवण्यात आला असला तरी खाजगी वाहनाने मोठ्या प्रमाणावर चाकरमानी जिल्हय़ात दाखल होत आहेत.त्यातील काही लोक अधिकृत पास घेऊन तर उर्वरित अनधिकृत येत आहेत.जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला आलेल्या चाकरमान्यांच्या स्वॅब टेस्ट घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण मिळाले त्यामुळे हादरलेल्या जिल्हा प्रशासनाने टेस्टिंगचे काम सुरू ठेवले.या टेस्टिंगसाठी रिपोर्ट मिरज येथे पाठवण्यात येत होते व काही टेस्ट कोल्हापूरला होत हाेत्या.मिरज येथील लॅबने रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर टेस्ट घेण्यास असमर्थता दाखविली. मधल्या काळात पाठवलेले काही स्वॅब मिरजेत स्वीकारण्यास नकार दिल्याने फुकट गेले.त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात स्वॅब टेस्टिंग सेंटर व्हावे या मागणीसाठी नेत्यांची स्पर्धा लागली आहे. जिल्ह्यात मुंबईतून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येणार याची कल्पना शासनकर्त्यांना होती मग रत्नागिरी जिल्ह्यात स्वॅब टेस्ट सेंटरची मागणी पूर्ण करण्यास हे नेते अपयशी का ठरले?आता पत्रे लिहून आम्ही रत्नागिरीत सेंटर व्हावे यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे खासदार सांगत आहेत शासनाने हे सेंटर रत्नागिरी जिल्ह्यात व्हावे यासाठी काल एक कमिटी रत्नागिरीत पाठवली ही कमिटी जिल्ह्यातील ठिकाणाची पाहणी करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर शासन रत्नागिरीत जिल्ह्यात सेंटर उघडण्याबाबत निर्णय घेणार आहे. हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदणे असा झाला आहे.जिल्ह्यातील अनेक संशयितांचे अहवाल अजूनही पेंडिंग आहेत चाकरमान्यांना आता संस्थात्मक कोराेन्टाइन न करता थेट होम कोराेन्टाइन करा व सगळ्यांच्या टेस्ट न करता लक्षणे आढळल्यास स्टेट करा असे शासनाकडून कळविण्यात आले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मंडणगड दापोली परिसरात प्रायोगिक तत्त्वावर अशा पद्धतीने चाकरमान्यांना होम कोराेन्टाइन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सध्या टेस्टची संख्या कमी झाली आहे
www.konkantoday.com