जिल्हा नियोजन आराखडा, मदत व पुनर्वसन निधी’ यातून निधी देऊन त्वरित रत्नागिरी साठी स्वॅब टेस्टिंग लॅब सुरु करा-अॅड. दीपक पटवर्धन
भा.ज.पा जिल्ह्याध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पालकमंत्री रत्नागिरी मा. अॅड. अनिल परब यांना पत्र देऊन रत्नागिरी मध्ये अन्य शहरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता व प्रलंबित असलेल्या स्वॅब रिपोर्टची संख्या पहाता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वॅब टेस्टिंग लॅब तात्काळ सुरु करावी. त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन आराखडा मदत व पुनर्वसन निधी या मधून निधी उपलब्ध करून द्यावा. कोणतीही कारण अडचणी पुढे न करता त्वरित लॅब सुरु करण्याचा निर्णय घेऊन कार्यान्वित करावा आवश्यक तर डेरवण हॉस्पिटलची मदत घेऊनही लॅब सुरु करावी अशी मागणी केली आहे
मोठ्या संख्येने वाढणारी कोरोनाग्रस्तानी संख्या, मोठ्या संख्येने रत्नागिरीत येणारे मुंबईकर नागरिक, कराव्या लागणाऱ्या स्वॅब टेस्टची संख्या, प्रलंबित असलेले अहवाल रत्नागिरीपासून मिरज पर्यंतचे अंतर, मिरज लॅबवर अहवालांचा पडणारा ताण, त्यातून जाणारा दीर्घ कालावधी यामुळे रत्नागिरीकरांसाठी वाढणारा कोरोनाचा धोका लक्षात घेवून तात्काळ स्वॅब टेस्ट लॅबसाठी निधी उपलब्ध करून देऊन अशी लॅब तात्काळ उभारावी अशी मागणी पालकमंत्री अॅड. अनिल परब यांचेकडे भा.ज.पा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
www.konkantoday.com